रत्नागिरीबँकेतील व्यवहार मराठीतच करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे शहरातील बँकांना...

बँकेतील व्यवहार मराठीतच करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे शहरातील बँकांना देण्यात आले निवेदन

राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दलकर जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांनी रत्नागिरी शहरातील सर्व बँका मध्ये भेट देऊन बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करा तसेच ग्राहकांसोबत पण मराठीतच संवाद व्हावा अशी मागणी करून निवेदन दिले. आगामी आठ दिवसात हे बदल दिसावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी शहर अध्यक्ष बाबय भाटकर महिला शहर अध्यक्ष संपदा राणा कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Breaking News