रत्नागिरीबुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या….

बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या….

रत्नागिरी बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी
रत्नागिरी : . महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी व आंदोलकांना त्यांचे अधिकारापासून वंचित ठेवून शांततेने चाललेले आंदोलन उधळून लावण्याचे काम प्रशासन करीत आहे यासाठी या मुक्ती आंदोलनास बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

*बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र, त्याचा ताबा बौद्धेतर विशेषत: ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे. या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करीत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे.
महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा तसेच नवीन कायदा तयार करून बुद्धगया महाबोधी बिहार या पवित्र स्थळावर मनुवादी ब्राह्मणांचा असलेला कब्जा हटवण्यात यावा आणि हे प्राचीन पवित्र स्थळ बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ रत्नागिरी यांच्या वतीने मागणी करण्यात येत असून तसे निवेदन भारताचे माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, बिहारचे माननीय मुख्यमंत्री, बिहारचे माननीय राज्यपाल, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल व रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चद्रंकात सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी महासंघाचे अध्यक्ष बी. के. कुरतडकर सरचिटणीस शरद कांबळे कार्याध्यक्ष जे. पी. जाधव उपाध्यक्ष सी. बी. मोहिते एम. बी. कांबळे मोहन जी. कांबळे सहकोषाध्यक्ष सुरेश कांबळे, सहसचिव अनिल कांबळे, भीमदास सावंत, संघटक संतोष अहिरे, सल्लागार गो. ल. साळवी, विजय गमरे, सदस्य सी. डी. गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, भार्गव जाधव, इत्यादी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते*

Breaking News