रत्नागिरीभरणा नाका येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांचे वतीने गरजु...

भरणा नाका येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांचे वतीने गरजु महिलांनी शिलाई मशीनचे वाटप

भरणा नाका येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांचे वतीने गरजु महिलांनी शिलाई मशीनचे वाटप
खेड :- भरणानाका येथील मेहता पेट्रोल पंपाजवळ पादुका दर्शन सोहळा- व सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू महिलांना शिवणयंत्र वाटप सोहोळा बुधवार दि. 11 मार्च 2026 रोजी माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर यांचेसह
जिल्हा परिषद सदस्य श्री. अरुण ऊर्फ आण्णा कदम, सुकीवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य श्री. सचिन धाडवे, नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, संजय जाधव, व संप्रदायातील भक्तगणांनी मोठ्या संख्येत उपस्थितीत दुर्बल घटकातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
हा एक समाजउपयोगी असा स्तुत्य उपक्रम रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांचेवतीने राबविण्यात आला. या समाजउपयोगी स्तुत्य उपक्रमाचे महिला वर्गातून समाधान व्यक्त करीत आहेत. हा उपक्रम म्हणजे आपल्या कुटुंबास स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी महिलांनी शिलाई मशीनचा वापर करावा. असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

Breaking News