रत्नागिरीभारतातील दुर्मिळ झालेल्या समुद्री गरुडाला जीवदान ,डहाणू रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी पाठवले

भारतातील दुर्मिळ झालेल्या समुद्री गरुडाला जीवदान ,डहाणू रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी पाठवले

भारतातील दुर्मिळ झालेल्या समुद्री गरुडाला जीवदान
डहाणू रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी पाठवले

रत्नागिरी / दापोली

कोकणात समुद्रकिनारी स्थलांतरीत भारतात दुर्मिळ होत चाललेल्या समुद्र गरुड पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुर्डी येथील पक्षी प्रेमी विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. 19 ऑगस्ट रोजी मौजे मुर्डी गावचे ग्रामस्थ विनय जोशी यांनी त्यांच्याकडे दुर्मिळ प्रजातीतला समुद्री गरुड (sea eagles )पक्षी जखमी अवस्थेत आल्याची माहिती त्यांनी तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना दिली. यावेळी वनविभागाच्या कोंगळे बीटाचे वनरक्षक प्रभू साबणे व ताडील बीटाच्या वनरक्षक शुभांगी गुरव व प्राणी मित्र प्रफुल जोशी यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विनय जोशी यांच्या सुरक्षितपणे बचावलेल्या गरुड पक्षाला ताब्यात घेण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी दापोली येथील डाॅ. श्रीमती कांबळे यांनी प्रथमोपचार केले.कांदळवन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी श्री.निकाळजे यांना घटनेची माहिती देऊन पुढील उपचारासाठी त्याला पालघर डहाणू येथे पाठवण्यात आले. डहाणू येथे वनविभागाचे पक्षी व प्राण्यांचे रेस्क्यू सेंटर आहे. समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या परराज्यातील स्थलांतरित दुर्मिळ समुद्र गरुड पक्षी असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याच प्रजातीच्या मादी व नराकडून झालेल्या झटापटीत या पक्षाला दोन छिद्र पडल्याने हा समुद्र गरुड पक्षी जखमी झाला आहे. पक्षावर डहाणू येथे पुढील वैद्यकीय उपचार होणार आहेत.असा कोणताही वन्यपक्षी वन्यप्राणी अडचणीत भेटला तर तत्काळ वन विभाग दापोली व कांदळवन विभाग रत्नागिरी यांचा शासकीय टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...