Modal title

महाराष्ट्रभारतावर नवं संकट ? शक्ती चक्री वादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा--

भारतावर नवं संकट ? शक्ती चक्री वादळाचा ‘या’ राज्यांना बसणार तडाखा–

मुबंई. शक्ती चक्रीवादळाच्या रूपाने भारतावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. याला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उप सागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 28 मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.

24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्याला धडकणार.‌

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ 23 मे ते 28 मे दरम्यान धोकादायक रूप धारण करू शकते. यामुळे पूर्वेकडील राज्यांच्या किनारी भागात आणि बांगलादेशातील खुलना मध्ये मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत हवामान विभागाने आधीच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार हे चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्यावर आदळू शकते, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 26/07/2025

१) मंडणगड -68.25.मिमी२) खेड - 109.00 मिमी३) दापोली -...

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...