मुंबई : कोकणासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांना tweet द्वारे आवाहन केले आहे
“मच्छीमार बांधवांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..! कोकण किनारपट्टीवर सोमवार दि.१८ ऑगस्ट ते शुक्रवार दि.२२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये.. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांनीही खबरदारी घ्यावी !”
मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये : मंत्री. नितेश राणे
