रत्नागिरीमतदारयादी पुनरिक्षणाच्या नावाखाली येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहा

मतदारयादी पुनरिक्षणाच्या नावाखाली येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहा

मतदारयादी पुनरिक्षणाच्या नावाखाली येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहा
फसवणूक टाळण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचे आवाहन–
रत्नागिरी, (जिमाका): सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम सुरू असून, या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांकडून नागरिकांची डिजिटल फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अज्ञात स्रोतांकडून आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशांना (मेसेजेस) किंवा लिंक्सना बळी पडू नये, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
सध्या बीएलओ (BLO) किंवा पुनरिक्षण प्रतिनिधींकडून मतदारयादी तपासणीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहितीची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या प्रमुख मार्गदर्शक सूचना:
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका: अनोळखी नंबरवरून आलेले संशयास्पद मेसेज उघडू नयेत किंवा त्यांना कोणताही प्रतिसाद देऊ नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी.
माहिती शेअर करू नका: एसआयआर (SIR) च्या नावाने येणाऱ्या कोणत्याही बनावट संदेशांना भुलून आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
बँक तपशील आणि ओटीपी (OTP) देऊ नका: कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्या बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत.
निवडणूक आयोगाच्या सेवा विनामूल्य: भारत निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कोणत्याही सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे पैशांची मागणी केल्यास त्वरित सावध व्हा.
अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवा: नागरिकांनी केवळ भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच BLO, AERO किंवा ERO यांच्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे.
सध्याच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मतदारयादीत नाव नोंदवताना किंवा अद्ययावत करताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...