रत्नागिरीमराठीच्या गौरवाची ही सांगता नाही, तर नव्या पर्वाची सुरुवात - उपमुख्यमंत्री एकनाथ...

मराठीच्या गौरवाची ही सांगता नाही, तर नव्या पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*मराठीच्या गौरवाची ही सांगता नाही, तर नव्या पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग व मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा यशस्वी सांगता समारंभ आज ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

👉या प्रसंगी ‘माझा मराठीचा बोलू कौतुके…’ या कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच अभियानांतर्गत मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

“आज या उपक्रमाची सांगता नाही तर ही सुरुवात आहे, मराठी भाषेच्या गौरवाची.. मराठीची ही सक्ती नाही तर ही भक्ती आहे. ही भक्ती पटवून दिली तर महाराष्ट्र प्रसन्न होईल. हा मराठी भाषेचा जयघोष आहे.” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री महोदयांच्या या भावना या संपूर्ण अभियानाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या आहेत. या अभियानाच्या यशामागे त्यांचे भक्कम नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी मराठीचा गौरव जागतिक पातळीवर वाढवला आहे. या सन्मानाला साजेसे कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे.

अमराठी प्रवासी व्यावसायिक वाहन चालकांना दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडेल असे मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

आजपर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक अमराठी व्यावसायिक वाहन चालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हा आकडा केवळ अभियानाच्या यशाचे प्रतीक नसून, महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या मराठी भाषेबद्दलच्या आपुलकीचे दर्शन घडवणारा आहे.

महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करावा, हा सकारात्मक संदेश या अभियानातून प्रभावीपणे पोहोचला आहे.

या अभियानासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, साहित्यिक, शिक्षक, स्वयंसेवक आणि असंख्य मराठीप्रेमी नागरिकांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. अभियानाच्या यशासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.

यापुढेही व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठीचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहणार आहे. मात्र, ही प्रक्रिया कोणावरही अन्याय करणारी नसेल. प्रत्येकाला मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली जाईल.

मराठी प्रत्येकाच्या मनात रुजावी, तिचा सन्मान वाढावा आणि महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाला मराठीशी आपलेपणाचे नाते जोडता यावे, यासाठी मराठी भाषा विभागाचे हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ,आमदार श्री. रविंद्र फाटक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, प्रदीप ढवळ, रवींद्र शोभणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...