रत्नागिरीमराठी उद्योजकांसाठी ऐतिहासिक दिवस!

मराठी उद्योजकांसाठी ऐतिहासिक दिवस!

२० जून हा दिवस “मराठी उद्योजक दिन” म्हणून साजरा होणार:- ना. उदय सामंत..
यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर आयोजित सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहतीच्या राज्यस्तरीय परिषद उद्घाटन समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

आजचा दिवस खास ठरतोय कारण २० जून १८५९ रोजी मराठी उद्योजकतेचे प्रणेते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला —
२० जून हा दिवस “मराठी उद्योजक दिन” म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत करण्यात आली!
लोखंडी नांगर आणि वॉटर लिफ्टिंग यंत्रांसारख्या संशोधनांनी जागतिक स्तरावर नाव कमावणाऱ्या किर्लोस्करांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण फक्त बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर द्यायला हवा असं वक्तव्य मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केलं.

या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. ललित गांधी आणि समितीचे पदाधिकारी, अनेक नामवंत उद्योजक यांचीही उपस्थिती लाभली.

Breaking News