रत्नागिरीमहाडीबीटी २.० द्वारे शिष्यवृत्ती योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटी २.० द्वारे शिष्यवृत्ती योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटी २.० द्वारे शिष्यवृत्ती योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तसेच इतर शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी २.०’ (MahaDBT 2.0) प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व पालकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.

संकेतस्थळ : विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी.

नूतनीकरणाची मुदत : सन २०२५-२६ मध्ये लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचे नूतनीकरण (Renewal) दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

सुलभ व पारदर्शक वितरण : महाडीबीटी २.० प्रणालीमुळे अर्ज प्रक्रियेत सुलभता आली असून लाभाचे थेट व पारदर्शक वितरण होणार आहे.

अचूक कागदपत्रे : विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे व वैयक्तिक माहिती अचूकपणे अपलोड करावी.

अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाशी अथवा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील एकाही पात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...