रत्नागिरीमहाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ६४...

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ६४ व्या वर्धापन दिन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून एमआयडीसीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ६४ व्या वर्धापन दिन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून एमआयडीसीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या–.

👉​यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. उदयजी सामंत ह्यांनी आज महाराष्ट्र जर देशामध्ये औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असेल, तर त्याचे संपूर्ण श्रेय आपल्या एमआयडीसीच्या दूरगामी धोरणांना, कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणि सातत्याने परिश्रम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाते, असे नमूद केले. राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, अत्याधुनिक उद्योग उभे राहावेत आणि त्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी आपले महायुती सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना आणि युवकांना कौशल्यपूर्ण रोजगारात प्राधान्य मिळावे, यासाठी आपण कटिबद्ध असून, महाराष्ट्र राज्याला देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर औद्योगिक महासत्ता बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

​याप्रसंगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्र सिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, श्री. अजित कुंभार, तसेच एमआयडीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विलास शंखे, एमआयडीसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. के. बी. पाटील, एमआयडीसी एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री. राजेंद्र मुमनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, विविध मान्यवर आणि उद्योजक उपस्थित होते.

Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी...

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक...