रत्नागिरी"महाराष्ट्रातील सर्वोत्तम मंत्री कोण ?"राज्यभरातील पत्रकारांकडून मंत्र्यांचे मूल्यमापन - उदय सामंत टॉप...

“महाराष्ट्रातील सर्वोत्तम मंत्री कोण ?”राज्यभरातील पत्रकारांकडून मंत्र्यांचे मूल्यमापन – उदय सामंत टॉप 3 मध्ये”

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरमध्ये झाला. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन राज्यातील पत्रकारांमार्फत करून घेण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत या तीन मंत्र्यांचे कामकाज सर्वाधिक चांगले असल्याचे पत्रकारांचे मत आहे.

राज्यभरातील पत्रकारांकडून मूल्यमापन

महाराष्ट्र दिनमान या वेब पोर्टल आणि यू ट्यूब चॅनलच्यावतीने संपादक विजय चोरमारे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामकाजासंदर्भातील हा सर्व्हे करण्यात आला. राज्यभरातील पन्नास पत्रकारांच्याकडून माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये काही प्रमुख वृत्तपत्रांचे विद्यमान तसेच ज्येष्ठ संपादक, मंत्रालयात काम करणारे राजकीय पत्रकार, विविध शहरांमध्ये फिल्डवर काम करणारे वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, राजकीय सामाजिक भान असलेले विविध थरांतले नवे-जुने पत्रकार यांचा समावेश होता. राज्याच्या सर्व विभागातील पत्रकारांचा यामध्ये समावेश होता. विविध पातळ्यांवर काम करणा-या पत्रकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून केलेले हे मूल्यमापन असल्यामुळे त्याची तटस्थता राखली गेली आहे.

ह्या सहा मुद्द्यांवर सर्वेक्षण

मुख्यमंत्र्यांनी आखून दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमानुसार वर्षभरातील कामगिरी, मंत्र्यांनी स्वजिल्ह्याबाहेर जाऊन राज्यपातळीवर केलेले काम, मंत्र्यांवरील आरोप, त्यांच्या खात्यातील अनागोंदी आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा व्यवहार, सर्वसामान्य नागरिकांसाठीची मंत्र्यांची उपलब्धता, मंत्री आणि त्यांच्या खात्याची प्रतिमा आणि मंत्री आणि जबाबदार नेते म्हणून कामगिरी अशा सहा मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले.

उदय सामंत “टॉप 3” मध्ये

बावनकुळे, शेलार आणि उदय सामंत यांच्यासह उत्तम कामगिरी असलेल्या पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. चंद्रशेखर बावनकुळे (४७ टक्के), आशिष शेलार (४५), उदय सामंत (४२.८), आदिती तटकरे (४१.१) आणि प्रकाश आबिटकर (३७.५) असे गुण मिळाले आहेत.

Breaking News