महाराष्ट्रमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 'विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा'

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’ . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’ आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन गटात होईल. लहान गट यामध्ये वयोगट १० ते १६ वर्षे, खुला गट १६ वर्षांवरील सर्वांना खुला आहे.

सर्व गटातील स्पर्धकांना व्यंगचित्राचे विषय भुताटकीचा खोटेपणा, बुवाबाजी – एक फसवणूक, अंधश्रद्धा आणि विज्ञान, विवेकी विचार हे चार विषय आहेत.

दोन्ही वयोगटाकरिता बक्षिसे ही प्रथम पारितोषिक ₹३,०००, द्वितीय ₹२,०००, तृतीय ₹१,००० अशी आहेत.

व्यंगचित्र मराठीत असावे. रंगीत अथवा कृष्णधवल चालेल. प्रत्येक स्पर्धक २ व्यंगचित्रे पाठवू शकतो. वरीलपैकी कोणत्याही दोन विषयांवरील चित्रे चालतील.
आपण काढलेली चित्रे artistunitedindia@gmail.com येथे मेल करावीत.

व्यंगचित्रे पाठवण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. निकाल जाहीर होण्याची तारीख ३१ मार्च २०२५ अशी आहे.

अंनिसच्या वतीने ‘विवेकरेषा’ नावाचे एक भारतातील प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन होणार आहे. त्या प्रदर्शनामध्ये स्पर्धेतील निवडक चित्रे लावली जातील.

व्यंगचित्रकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कुंचल्याने विवेकाचा विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकवाद रुजवण्यात चित्रकारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तेव्हा या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त चित्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धेचे संयोजक व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख यांनी केले आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...