रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयाच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. स्वरा जाध्यार हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेत कु. स्वराने रत्नागिरीत सहावा गुणवत्ता क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

स्वराच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, अभ्यासू वृत्ती तसेच पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व व्यवस्थापन यांनी कु. स्वराचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा विद्यालयाचा संकल्प यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Breaking News

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार- 👉रत्नागिरी...

Énergie solaire ou éolienne : laquelle améliore vraiment votre quotidien ?

Énergie solaire ou éolienne : laquelle améliore vraiment votre...