रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयात सिनियर केजी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात सिनियर केजी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात सिनियर केजी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

👉मुकुल माधव फौंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांच्या अनौख्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतुक
👉 रत्नागिरी पावस मार्गावरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालय येथे सिनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला..

लहान मुलांचा उत्साह पाहून पाहुणे व पालक भारावून गेले असल्याचे दिसून येत होते.
या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण 24 तास न्यूज चॅनल चे मुख्य संपादक तथा वरिष्ठ पत्रकार श्री. अलिमिया काझी.डॉ. मिलिंद यादव (उपप्राचार्य, FAMT) तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज चे श्री. रामबाबू संका (टेक्निकल डायरेक्टर), श्री. सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), श्री. अनुप करमरकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. अनिलकुमार सत्पती (प्रयोगशाळा विभाग प्रमुख) आणि श्री. अमित घोरपडे (H.O.D., सिव्हिल विभाग, F.I.L.) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अंगणवाडी विभागातील प्रतिनिधींनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाची सुरुवात आनंदी वातावरणात झाली. विद्यार्थ्यांना ऑलिंपियाड प्रमाणपत्रे व मेडलचे वितरण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन कॅप परिधान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी अत्यंत अभिमानास्पद व संस्मरणीय ठरला.
यावेळी आमच्या लहानग्या प्रतिभावान लेखिका अहाना चांग्राणी हिने विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देऊन कौतुकास्पद उपक्रम राबवला. तिच्या या सुंदर उपक्रमाबद्दल आम्ही तिचे मनःपूर्वक आभार मानतो.
या प्रसंगी काही सिनियर केजी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार, अनुभव आणि शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी प्रतिनिधींनी फिनोलेक्स फाउंडेशनतर्फे अंगणवाड्यांना शैक्षणिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सहकार्याविषयी माहिती देत आपले मौल्यवान विचार मांडले.
त्यानंतर सिनियर केजी वर्गाच्या शिक्षिका सौ. सोनाली सनगरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. शाळेचे उपप्राचार्य श्री. समीर अल्हाट यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शनपर विचार दिले. श्री. रामबाबू संका यांनी प्रेरणादायी भाषण केले, तर प्रमुख पाहुणे श्री. अलिमिया काझी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करत मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे विशेष गौरव केले. त्यांनी शाळेची प्रगती तसेच आदरणीय रितू छाब्रिया मॅडम यांच्या मोलाच्या योगदानाचाही उल्लेख केला. डॉक्टर मिलिंद यादव व सागर चिवटे यांनी ही आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमात सिनियर केजी विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर करून वातावरण आनंदी केले तसेच उत्साही नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. श्रुती गंगावणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. मनीषा घाणेकर यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एकूणच, हा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि उपस्थित सर्व मान्यवरांसाठी अविस्मरणीय व आनंददायी ठरला.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...