या पैकी मे. युरोबस भारत प्रा. लि. ही कंपनी पुणे जिल्ह्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक बसेसची निर्मिती करणार आहे. कंपनी याठिकाणी ४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून १२ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कंपनीचे प्रतिनिधी श्री. पीटर हार्टमॅन, श्री. अमेय जोशी आणि डॉ. सचिन काटे यांनी यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांची सदिच्छा भेट घेत बसची प्रतिकृती भेट म्हणून दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विविध १७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
