रत्नागिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात; कष्टकरी महिला शेतकरी भगिनींचा सन्मान

👉मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या वतीने ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ अंतर्गत कष्टकरी महिला शेतकरी भगिनींचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला.

यावेळी रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत शेतकरी हा अन्नदाता मानला जातो आणि त्यामध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शेतीसोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्या अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कष्टामुळे समाज आणि देशाची प्रगती होत आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, शेतकरीहिताचे निर्णय तसेच महिलांच्या सन्मानासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी व वीजबिल थकबाकी माफीसारख्या निर्णयांमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला देवाभाऊ कृषी माऊली सोहळा जिल्हा प्रभारी व रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ. शर्मिला पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सौ. मंजुषा कुद्री मोदी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी लुबदे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. ऐश्वर्या जठार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, रत्नागिरी शहर अध्यक्षा सौ. भक्ती दळी, मंडळ कृषी अधिकारी श्री. विकास मेढे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सौ. हर्षला पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा रुपाली कदम, स्नेहा चव्हाण, संगीता कवितके, शितल रानडे तसेच सौ. सायली बेर्डे, वैदेही बने, सुयोगा जठार, स्वाती कारंगुटकर, अदिती गुडेकर, शीतल दिंडे, रसिका देवळेकर, सुचिता नाचणकर, ध्रुवी लाकडे, अनघा साळवी यांच्यासह महिला मोर्चाच्या विविध तालुका मंडळ अध्यक्षा, पदाधिकारी, महिला शेतकरी भगिनी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात कष्टकरी महिला शेतकरी भगिनींचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कष्टाला आणि योगदानाला मानाचा मुजरा अर्पण करत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक समृद्ध, प्रगत आणि शेतकरीहिताचा राज्य म्हणून पुढे जावो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...