रत्नागिरीमुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत वाहनांचे करण्यात आले...

मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत वाहनांचे करण्यात आले वाटप–

मतदार संघातील जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा:- आमदार किरण सामंत
*लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील युवकाना रोजगाराच्या दृष्टीने मदत करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी एक पाऊल पुढे येऊन *मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथे वाहनांच्या किल्ल्या लाभार्थीना सुपूर्त करण्यात आल्या.*
शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन आपला उद्योग धंदा वाढण्याच्या दृष्टीने मतदार संघातील युवक व युवती यांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी माझ्या संपर्क कार्यालयातून मदत केली जात आहे लागणारे मार्गदर्शन दिले जाते. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे असे आव्हान लांजा राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले आहे.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अजिंक्य आजगेकर,तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, गणेश लाखण, मनोहर बाईत, बाबा लांजेकर, संतोष रेवाळे, राहुल शिंदे, प्रवीण पाटोळे, तसेच सर्व लाभार्थी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News