रत्नागिरीमोंथा चक्री वादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरण मधील बोट समुद्रात भरकटली.अनेक मच्छीमार...

मोंथा चक्री वादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरण मधील बोट समुद्रात भरकटली.अनेक मच्छीमार नौका बंदरात दाखल

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने देवगड .जयगड व मिरकरवाडा बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत. समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र (Arabian Sea) या दोन्ही समुद्र सध्या खवलेले असून याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी देवगड.जयगड व मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.

अरबी समुद्रात उठलेल्या वादळांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या शेकडो बोटींचा संपर्क तुटला आहे. उरणमधील न्हावा शेवा गावातील तीन बोटी भरकटलेल्या असून यावर जवळपास 50 खलाशी आहेत. कोस्ट गार्ड आणि बोट मालकांशी बेपत्ता बोटींचा संपर्क होत नसल्याने 50 खलाशांच्या जिविताची चिंता सध्या त्यांच्या कुटुंबीयांना लागली आहे. श्री गावदेवी मरीन आणि चंद्राई नावाच्या दोन बोटी सत्यवान पाटील यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी आपल्या दोन बोटींचा अद्याप संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे. कोस्ट गार्ड , नेव्ही , मत्स विभाग यांच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या बोटींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान हवामान खाते व जिल्हा प्रशासनाने पुढील दोन दिवस तरी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे

Breaking News