महाराष्ट्रयंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती…

यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती…

यावर्षीच्या पावसाळ्या मध्ये खालील तारखांना सावध राहा मोठी भरती असण्याच्या कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, तसेच या मुंबई महानगर पालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.*
यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती,या तारखांना सावध राहा..
पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या मान्सूनमध्ये जूनपासून दि. २८ जून २०२५ पर्यंत असे सलग ५ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या दिवसात समुद्राच्या किनारी पावसात भिजताना सावधान राहावे असे म्हटले जात आहे.
मंगळवार दि. २४ ते २८ जून २०२५ पर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान एकूण १९ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
सर्वाधिक उंचीची लाट दि. २६ जून रोजी उसळणार
यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दि. २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, तसेच या मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.

यंदाच्या पावसाळ्या दरम्यान मोठ्या भरतीचा तपशिल खालीलप्रमाणेः-

जून २०२५
१. मंगळवार, दि. २४ जून सकाळी – ११.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

२. बुधवार, दि. २५ जून दुपारी – १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७१

३. गुरुवार, दि. २६ जून दुपारी – १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७५

४. शुक्रवार, दि. २७ जून दुपारी – ०१.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७३

५. शनिवार, दि. २८जून दुपारी – ०२.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४

जुलै २०२५
१. गुरुवार, दि. २४ जुलै सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

२. शुक्रवार, दि. २५ जुलै दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६६

३. शनिवार, दि. २६ जुलै दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६७

४. रविवार, दि. २७ जुलै दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६०

ऑगस्ट २०२५
१. रविवार, दि. १० ऑगस्ट दुपारी – १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५०

२. सोमवार, दि. ११ ऑगस्ट दुपारी – ०१.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८

३. मंगळवार, दि. १२ ऑगस्ट दुपारी – ०१.५२ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८

४. शनिवार, दि. २३ ऑगस्ट दुपारी – १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५४

५. रविवार, दि. २४ ऑगस्ट दुपारी – १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५३

सप्टेंबर २०२५
१. सोमवार, दि. ०८ सप्टेंबर दुपारी – १२.१० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

२. मंगळवार, दि. ०९सप्टेंबर दुपारी – १२.४१ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६३

३. बुधवार, दि. १०सप्टेंबर मध्यरात्री – ०१.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

४. बुधवार, दि. १० सप्टेंबर दुपारी – १३.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

५. गुरुवार, दि. ११ सप्टेंबर मध्यरात्री – ०१.५८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

Breaking News