यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित दलित पँथरच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
दलित पँथर ही चळवळ केवळ आंदोलन नव्हे, तर वंचितांच्या हक्कांचा बुलंद आवाज होता.
जगात अन्यायाविरोधात उभी राहिलेली Black Panther ही संस्था प्रेरणास्थान ठरली, आणि भारतात तिचा आवाज बनले –. स्व. नामदेव ढसाळ साहेबांचे नेतृत्वातील दलित पँथर. या चळवळीतून सोनावणे साहेबांसारखे नेतृत्त्व घडले, ज्यांच्याकडे पाहून त्यांच्या आक्रमकतेचा, संघटन कौशल्याचा आणि बांधिलकीचा अंदाज येतो.
विशेष म्हणजे उद्योजकांचा सत्कार करून सामाजिक परिवर्तनात उद्योगजगताची भूमिका अधोरेखित करण्यात आली. या देशाच्या आर्थिक रचनेत आमूलाग्र बदल घडवायची ताकद उद्योजकांमध्ये आहे.
आज अभिमानाने सांगतो की, जर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म भारतात झाला नसता, तर मी – उदय सामंत – मंत्री होऊ शकलो नसतो. बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही ही पारदर्शक, सबळ आणि सर्वसमावेशक आहे. लंडनमधील त्यांच्या राहत्या घराचे स्मारक हे या लोकशाहीचे प्रतीक ठरते – जे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय स्मारक म्हणून उभं राहिलं.
आज मी भाग्यवान आहे की बाबासाहेबांच्या जन्मगावाचा पालकमंत्री म्हणून काम करत आहे. या गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शासकीय जयंती साजरी केली गेली – हा केवळ कार्यक्रम नाही, तर सामाजिक न्यायाची जिवंत साक्ष आहे.
आज मी या कार्यक्रमात नुसता उपस्थित नाही, तर एक शपथ घेऊन जातो –जोपर्यंत मी राजकारणात आहे, तोपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कधीही तडा जाऊ देणार नाही! सोनावणे साहेब यांनी, पुढच्या वेळी कार्यक्रमात आमंत्रण आलं नाही तरी, मी नक्की येणार! असा शब्द मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या कार्यक्रमाच्यानिमित्ताने दिला.
याप्रसंगी मंत्री भरत गोगावले यासंह दलित पँथर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
