रत्नागिरीयश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे जागतिक...

यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला

यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला–.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. माधवी सुरेंद्रनाथ माने आणि सौ. शिवानी मिहीर माने उपस्थित होत्या. तसेच प्रिन्सिपल चेतन अंबुपे, रजिस्ट्रार शलाका लाड, डेप्युटी रजिस्ट्रार मानसी मुळे तसेच कॉलेजमधील सर्व टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त थीम ओपनिंग, रांगोळी स्पर्धा, कविता वाचन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महिला सशक्तीकरणाचा प्रेरणादायी संदेश दिला.
याच प्रसंगी कॉलेजमधील सुनीता अरगडे मॅडम (Associate Professor) यांना ईगल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय “रणरागिनी” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कॉलेजतर्फे त्यांचे विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा संपूर्ण संस्थेला अभिमान आहे.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत हा दिवस आनंदात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

Breaking News

संपर्क युनिक फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचे होत आहे सर्वत्र कौतुक

संपर्क युनिक फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचे होत आहे सर्वत्र...

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी,  (जिमाका) :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार...