रत्नागिरी नगरपरिषदे तर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत विविध जनजागृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना शहरातील अनेक शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धांमध्ये शहरातील धनजीनाका परिसरातील M. S. Naik Primary English Medium School च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन यांसारख्या विषयांवर चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे ( छोटा गट,मोठा गट) या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प, घोषवाक्ये व सादरीकरणे अत्यंत प्रभावी ठरली. त्यांच्या सर्जनशीलतेला व सामाजिक जाणीवेला परीक्षकांनी विशेष दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांनी स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.
या उपक्रमादरम्यान शाळेच्या शिक्षक प्रतिनिधींना ‘पर्यावरण दूत’ म्हणून घोषित करण्यात आले, ही शाळेसाठी अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब ठरली. या सन्मानामुळे शाळेच्या कार्याची दखल घेतली गेली असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, पालकवर्गानेही समाधान व्यक्त केले आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये शाळा अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.संस्थेचे अध्यक्ष श्री. नोमान नाईक,शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अकिब काझी,
शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरिफा म्हालदार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अशफाक नाईक यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
रत्नागिरीच्या एम.एस. नाईक इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छ सर्वेक्षणात घवघवीत यश; शिक्षक ‘पर्यावरण दूत’ घोषित
