रत्नागिरीरत्नागिरीच्या विकासासाठी मुंबईस्थित मंडळासमवेत ना. उदय सामंत ह्यांचा संवाद

रत्नागिरीच्या विकासासाठी मुंबईस्थित मंडळासमवेत ना. उदय सामंत ह्यांचा संवाद

आज दादर (पूर्व), मुंबई येथे रत्नागिरी–संगमेश्वर येथील मुंबईस्थित मंडळांच्या सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून संबोधित केले.

या निमित्ताने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर संवाद साधला. या वर्षभरात रत्नागिरी मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा कार्यअहवाल सादर करताना रत्नागिरीतील मुंबईकर बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली असून रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणखी जोमाने कार्य करत राहू — हाच निर्धार आज या भेटीमधून अधिक दृढ झाला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

त्यावेळी सभेला मुंबईतील 155 मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा– पालकमंत्री डॉ. उदय...

रत्नागिरीत जागतिक महिला दिनानिमित्त “श्री अन्न महोत्सव” प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय...