रत्नागिरीरत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट देत मत्स्यव्यवसाय विकासावर केली...

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट देत मत्स्यव्यवसाय विकासावर केली चर्चा

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट देत मत्स्यव्यवसाय विकासावर केली चर्चा—
👉डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे दापोली येथील १६ पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी विशेष भेट दिली. दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय आणि संशोधन कार्याची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. के. जे. चौधरी यांनी सर्व पत्रकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी उपस्थित प्रसार माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील, विशेषतः दक्षिण कोकण किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विकासामध्ये ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. मत्स्य संवर्धन, सागरी जीवांचे जतन आणि मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. शेवटी त्यांनी संशोधन केंद्राच्या ‘मत्स्यालय व मत्स्य-संग्रहालय’ तसेच ‘जलपर्यटन (नौकानयन)’ प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. डी. देसाई यांनी या संपूर्ण दौऱ्याचे नेटके नियोजन आणि नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांनी केंद्रातील विविध विभागांना भेटी दिल्या. या भेटीमुळे विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान सामान्य मच्छिमार व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. या दौऱ्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले असून, कृषी आणि मत्स्य क्षेत्रातील नवनवीन प्रयोग समाजासमोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे तसेच डॉ. राजेश ठोकळ, विस्तार शिक्षण संचालक आणि डॉ. प्रशांत शहारे, संशोधन संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या करीता करीता डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक, डॉ. हरीश धमगये, अभिरक्षक, प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही.आर. सदावर्ते, श्रीम. ए.एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην Πράξη

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην...