रत्नागिरीरत्नागिरीत जागतिक महिला दिनानिमित्त “श्री अन्न महोत्सव” प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरीत जागतिक महिला दिनानिमित्त “श्री अन्न महोत्सव” प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने “श्री अन्न महोत्सव” या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच शहराध्यक्ष महिला भक्ती मनोर दळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले

यावेळी महिलांना श्री अन्न (भरड) धान्यांचे आरोग्यदायी महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य तसेच दैनंदिन आहारामध्ये त्यांचा वापर कसा वाढवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन सौ वर्षा ताई गोरिवले यांच्याकडून देण्यात आले

केंद्र सरकारकडून भरड धान्यांच्या प्रसारासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही या प्रशिक्षणातून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विविध भरड धान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत श्री अन्नाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली कशी अंगीकारता येईल याबाबत मार्गदर्शन घेतले.

या कार्यक्रमाला महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस नपुरा मुळे, माजी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, नगरसेविका मानसी करमकर, सुप्रिया रसाळ तसेच महिला मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्या, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला सशक्तीकरणाबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थित महिलांनी अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम पुढेही आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...