रत्नागिरीरत्नागिरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

रत्नागिरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

रत्नागिरी : येथे धनगर समाजाच्या वतीने एमआयडीसीतील एका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
वेळी युवा समाज नेते अमृत गोरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली आणि आपल्या समाजाचे समाज भवन लवकरात लवकर बांधण्यात यावे, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे आणि सर्वांनी याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन श्री. गोरे यांनी केले.
अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे व सर्व सरकारी कार्यालय, जिल्हा परिषद शाळा यांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा लावण्यात यावी, या मागणीसाठी लवकरच जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीचे संतोष झोरे, समाज सेवक अमृत गोरे, मंगेश वरक (आंबेड), सुरेश येडगे, पार्थ बावदने, संजय आखाडे (हरचेरी), तुषार झोरे (हरचेरी), दर्शन झोरे, सुयश झोरे, शिवाजी राठोड, साक्षी झोरे, समृद्धी झोरे, अक्षता झोरे, अमित चव्हाण, शेर शहा, चांद शहा, अनिल कुमार, स्वयम शेळके आदी उपस्थित होते.

Breaking News