रत्नागिरीरत्नागिरीत भाजपची तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न

रत्नागिरीत भाजपची तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न

रत्नागिरीत भाजपची तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न
भारत माता की जय वंदे मातरम्च्या जयघोषाने शहर दुमदुमले नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा श्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मा श्री प्रशांत यादव यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा बाईक रॅली आज शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली

मारुती मंदिर येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली सावरकर चौक मार्गे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा दुचाकींवर लावलेले राष्ट्रध्वज आणि भारत माता की जय वंदे मातरम्च्या जयघोषाने संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले

या तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रत्नागिरी शहरातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नागरिकांमध्ये रॅलीबाबत प्रचंड उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना पाहायला मिळाली रॅली अत्यंत शिस्तबद्ध दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे रॅलीचे संयोजक श्री संतोष सावंत महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ भक्ती दळवी युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री अजिंक्य केसरकर जिल्हा सरचिटणीस श्री ओंकार फडके उपाध्यक्ष श्री राजू भाटलेकर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर श्री मंदार खंडकर नगरसेवक तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला

रत्नागिरीकरांनी तिरंगा बाईक रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपल्या शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दाखवणारा आहे तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे असे शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे यांनी सांगितले

राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही भव्य तिरंगा बाईक रॅली भारत माता की जय’ आणि वंदे मातरम्च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...