रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खेर्डी शाखेचा माहिती मेळावा उत्साहात संपन्न

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खेर्डी शाखेचा माहिती मेळावा उत्साहात संपन्न

खेर्डी (ता. चिपळूण) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी – खेर्डी शाखेच्या वतीने खेर्डी ग्रामपंचायत येथील श्रीकृष्ण सभागृहात विविध बँक योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शाखा व्यवस्थापक सौ. प्रिया खानविलकर यांनी बँकेच्या विविध योजना ग्रामस्थांना समजावून सांगितल्या. यामध्ये खालील योजना समाविष्ट होता.
बिगर शेती कर्ज योजना,
ग्रामीण व कृषी पर्यटन विकास योजना,
ग्रामीण घरकुल गृहकर्ज योजना,
शैक्षणिक कर्ज योजना,
कॅश क्रेडिट योजना,
मच्छिमार कर्ज योजना,
शेती व शेतीपूरक व्यवसाय कर्ज योजना,
दोन व चार चाकी वाहन खरेदी कर्ज योजना,
पगार तारण कर्ज योजना,
सहलीसाठी कर्ज योजना,
ग्रामीण व शहरी वैयक्तिक कर्ज योजना,
गणपती मूर्तीकारांना विशेष कर्ज योजना,
डेअरी युनिट कर्ज योजना,
विहीर बांधणी, पुनर्बांधणी, खुदाई व त्रिंबक सिंचनासाठी कर्ज योजना,
स्थावर / स्त्रीवर मालमत्ता तारण कर्ज योजना,
कुक्कुटपालन व्यवसाय कर्ज,
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना, एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत योजना,विमा योजना व इतर शासकीय योजना सौ. खानविलकर यांनी
समजावून सांगितल्या. त्यांनी
आवाहन केले की गावातील तसेच इतर गावातील जास्तीत जास्त लोकांनी बँकेच्या या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी गावात व वाडी-वस्त्यांवर जाऊन थेट जनजागृती केली जाणार असून विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास खेर्डी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ अनिल फाळके यांची देखील उपस्थिती होती.
हा मेळावा ग्रामस्थांमध्ये बँकेच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यात निश्चितच उपयुक्त ठरला. १. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY)
वयाची अट: 18 ते 50 वर्षे
वार्षिक हप्ता: ₹436 (बँक खात्यातून दरवर्षी कपात)
मृत्यू लाभ: विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्दिष्ट व्यक्तीस ₹2 लाख मिळतात
लाभार्थी अट: बँकेत बचत खाते असणे आवश्यक२. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (Pm bby)
वयाची अट: 18 ते 70 वर्षे
वार्षिक हप्ता: ₹20 (बँक खात्यातून दरवर्षी कपात)
अपघाती मृत्यू/अपंगत्व लाभ:
पूर्ण अपघाती मृत्यू – ₹2 लाख
अंशतः अपंगत्व – ₹1 लाख
लाभार्थी अट: बँकेत बचत खाते असणे आवश्यक
३. अटल पेन्शन योजना (APY)
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
ठराविक हप्त्यांनुसार पेन्शन:
60 वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक पेन्शन ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत
हप्ता: मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही हप्ता (वय व पेन्शन निवडीनुसार)
लाभ: संगठित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वृद्धापकाळी आर्थिक सुरक्षितता
४. प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)
उद्दिष्ट: सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधांशी जोडणे
लाभ:
झीरो बॅलन्स बचत खाते
मोफत रुपे डेबिट कार्ड
₹1 लाख अपघाती विमा
थेट लाभ हस्तांतरण (DBT)
ओव्हरड्राफ्ट सुविधा (₹10,000 पर्यंत, काही अटींवर)
हे सर्व योजना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेर्डी शाखेमध्येही उपलब्ध आहेत.
ग्रामस्थांनी अधिक माहितीसाठी बँकेत संपर्क साधावा आणि या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक व्यवस्थापक सौ. प्रिया खानविलकर यांनी केले आहे.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...