रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघामार्फत दिनांक 10.02.26 रोजी ड्रीप इरिगेशन आणि...

रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघामार्फत दिनांक 10.02.26 रोजी ड्रीप इरिगेशन आणि सघन आंबा लागवड ह्या संदर्भात एक कार्यशाळा घेतली होती

रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघामार्फत दिनांक 10.02.26 रोजी ड्रीप इरिगेशन आणि सघन आंबा लागवड ह्या संदर्भात एक कार्यशाळा घेतली होती. सदर कार्यशाळेला जैन इरिगेशन चे श्री. गाडेकर साहेबांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. ड्रीप इरिगेशन चे महत्व आणि वर्षभर ड्रीप मधून देण्यात येणाऱ्या खतांचे नियोजन तसेच सघन लागवड ह्यावर उत्तम चर्चा झाली आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
जिल्हा कृषी अधिकारी श्री. सदाफुले साहेबांनी सर्व शासकीय योजनांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
Ai चा वापर करून तयार करण्यात आलेल्या शासकीय मोबाईल ऍप ची माहिती सदाफुले साहेबांनी दिली आणि सर्व शेतकऱ्यांना हे ऍप वापरण्यास उदयुक्त केले.
ह्या कार्यशाळेला जिल्हा कृषी कार्यालयाकडून विशेष सहकार्य मिळाले.
दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. श्री. किरण माळशे साहेबांनी आंबा पिकाविषयी मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक श्राईन इसुझु यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला इसुझु कंपनी आणि त्यांच्या गाड्यांची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच वेदा प्लास्टिक यांनी आंबा शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या निरनिराळ्या क्रेट्स चे प्रात्यक्षिक दाखवले. राघव पॅकेजिंग च्या मराठे यांनी अतिशय स्वस्त आणि दर्जेदार कोरोगेटेड बॉक्स चे वेगवेगळे सॅम्पल शेतकऱ्यांना दाखवले.
आंबा संघामार्फत प्रसन्न पेठे आणि अल्ताफ काझी यांनी सर्वांचे स्वागत केले.
आपल्यातील जुने जाणते शेतकरी उदय पटवर्धन यांनी उपस्थित राहून कोकणी शेतकरी उतारवयात देखील नविन तंत्रज्ञान शिकण्यास किती उत्सुक आणि सजग आहे ह्याचा आदर्श घालून दिला. सुमारे 150 शेतकऱ्यांनी ह्या कार्यशाळेचा लाभ घेतला. ह्या कार्यक्रमास आमदार श्री. किरणजी सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
मंदार सरपोतदार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Breaking News

रत्नागिरीतील माड मँगो पिकनिक

माड मँगो (Maad Mango) हे रत्नागिरीतील शिरगाव येथे स्थित...