चिपळूणरत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून...

रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे

रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे.

या मद्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकरांसह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. बेवारस स्थितीत आढळलेला हा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, या मद्यसाठ्याचा मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे..

Breaking News