रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीकच्या लोटे परशुराम MIDC मधील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या घातक...

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीकच्या लोटे परशुराम MIDC मधील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या घातक PFAS (फॉरएव्हर केमिकल्स) उत्पादना विरोधात कोकण नागरी संघर्ष समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व आमदार भाई जगताप यांनी भेट दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीकच्या लोटे परशुराम MIDC मधील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या घातक PFAS (फॉरएव्हर केमिकल्स) उत्पादना विरोधात कोकण नागरी संघर्ष समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व आमदार भाई जगताप यांनी भेट दिली. या आंदोलनाचा चाळीसावा दिवस आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि संघर्षकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य जाहीर केले.
कोकणाचा निसर्ग, पाणी, आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांना वाचवण्यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत धोकादायक अशा ‘मिटेनी’ कंपनीने इटलीमध्ये प्रचंड नुकसान केले. 2019 मध्ये कंपनी दिवाळखोरीनंतर तिचे मशीनरी, पेटंट्स आणि तंत्रज्ञान Laxmi Organic Industries (भारतीय कंपनी) च्या subsidiary Viva Lifesciences ने खरेदी केले. हे सर्व परशुराम MIDC येथे हलवले गेले आणि तेथे PFAS-संबंधित उत्पादन सुरू झाले. इटलीत बंद झालेली ही “विषारी” कंपनी भारतात आणली गेली, ज्यामुळे कोकणातील पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक संघर्ष समित्या आंदोलन करत आहेत.
मिटेनीचा इतिहास नफा आणि पर्यावरणीय नुकसान यांच्यातील संघर्षाचे एक मोठे उदाहरण आहे – जिथे “फॉरएव्हर केमिकल्स” मुळे लाखो लोकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम झाले. अशा या धोकादायक रसायनाचे उत्पादन तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी ही आमची ठाम मागणी आहे असे ते म्हणाले आणि
एकत्र येऊन लढूया… कोकण सुरक्षित ठेवूया असे ही त्यांनी जाहीर केले आहे

Breaking News

पक्ष्यांपासून खूप काही शिकण्यासारखे

१. सुर्योदयापूर्वी व सुर्यास्तानतंर पक्षी काहीही खात नाहीत..२. पक्षी...

यंदाचा उन्हाळा जास्त जाणवण्याची शक्यता ?

यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे या काळात कमाल...