विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध नैसर्गिक व अभियांत्रिकी अविष्कारांचा अनुभव घेतला. सकाळी त्यांनी ग्रँड कॅनियनला भेट देऊन कोलोरॅडो नदीने कोरलेल्या या अद्भुत दरीचे अप्रतिम दृश्य पाहिले. जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असलेल्या या स्थळाने त्यांना निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण संवर्धन याविषयीची जाणीव करून दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी हूवर डॅमला भेट दिली. कोलोरॅडो नदीवर वसलेला हा प्रचंड धरण अमेरिकेच्या वीजपुरवठा व पाणीपुरवठ्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. अभियांत्रिकी कौशल्य, जलव्यवस्थापन आणि उर्जानिर्मिती यावरील माहिती विद्यार्थ्यांनी उत्साहाने आत्मसात केली.
