रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६
बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त–
रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव – उद्यमनगर. कातळवाडी येथील एमआयडीसीच्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेली बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपऱ्यांवर एमआयडीसीकडून शुक्रवार २९ मे रोजी कारवाईचा बडगा उगारण्यात आला असुन अर्धवट अवस्थेत असलेली बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
👉यावेळी २६ बेकायदेशीर पक्की बांधकामे आणि टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.
रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव एमआयडीसीअंतर्गत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बांधकामांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही ही बांधकामे हटवण्यात आली नव्हती. अखेर
याप्रकरणी एमआयडीसीने न्यायालयाचा आधार घेतला. त्यानंतर गुरुवार, दि. २८ रोजी बांधकामे हटवण्याचे एमआयडीसीने निश्चित केले. परंतु बुधवारी असलेली बकरी ईद गुरुवार, २८ रोजी साजरी होणार असल्याने एमआयडीसीने ही कारवाई पुढे ढकलली.
एमआयडीसीचे कर्मचारी , सुरक्षा रक्षक, पोलिस यंत्रणा, दोन जेसीबी, ट्रॅक्टर साहित्य घेऊन शुक्रवारी या भागात पोहोचले आणि सकाळपासून बांधकामे तोडण्यास सुरूवात केली. एमआयडीसीच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या कारवाईत कोणताच अडथळा आला नाही… अर्धवट अवस्थेत असलेली बांधकामे तोडण्यात आली असली तरी पावसाळ्या नंतर ईतर पक्की बांधकामे ही तोडली जाणार असल्याचे एमआयडीसी कडुन सांगण्यात आले आहे
