रत्नागिरी येथील शासकीय विश्राम गृह येथे भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरक असोसिएशन चे प्रतिनिधी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गँस तुटवडा, ग्राहकांना OTP शिवाय सिलेंडर नाही, ऑनलाईन बुकिंग तसेच ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने OTP मिळत नसल्यामुळे ग्राहकांना सिलेंडर देता येत नाही.याबाबत प्रमोद जठार यांना निवेदन देऊन चर्चा केली.
आमदार प्रमोद जठार यांनी ताबडतोब इंडियन ऑइल कंपनी च्या वरिष्ठ अधिकारी नितु जैन आणि नागवेकर यांचेशी फोन द्वारे संपर्क केला आणि कोकणातील मोबाईल नेटवर्क बाबत स्पष्ट कल्पना दिली आणि OTP बाबत शिथिलता द्यावी असे स्पष्ट आदेशच दिले. नागवेकर यांनी याबाबत ताबडतोब कार्यवाही करतो असे ठोस आश्वासन दिले
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, दत्ताराम लिंगायत, मनोज लोकरे, अंकुश पिलवळकर, तसेच भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते
रत्नागिरी येथील शासकीय विश्राम गृह येथे भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरक असोसिएशन चे प्रतिनिधी यांची भेट घेऊन निवेदन दिले
