रत्नागिरीरत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित ,एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला मिळाला...

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित ,एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित
एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद–

नगरसेवक सौरभ मलुष्टेंचा उपक्रम- ३ दिवसांत ५०० महिला व ज्येष्ठांची नोंदणी—

रत्नागिरी एस.टी. महामंडळाच्या बस प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ सुलभतेने घेता यावा, यासाठी नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित तीन दिवसीय ‘एनसीएमसी कार्ड’ नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॅम्पच्या माध्यमातून तब्बल ४५० ते ५०० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कार्डची यशस्वी नोंदणी केली. आपल्या हक्काच्या प्रवासाची सुविधा थेट प्रभागातच उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण शेठ सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित, बिपीन बंदरकर आणि बंड्या साळवी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
शासकीय योजना व सवलतींचा लाभ नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना आणि वेळेची बचत करून मिळवून देणे, हा या नोंदणी शिबिरामागचा मुख्य उद्देश होता. बस स्थानकावर होणारी गर्दी आणि रांगा टाळून थेट प्रभागातच ही सोय उपलब्ध करून दिल्यामुळे महिला आणि वयोवृद्ध नागरिकांनी नगरसेवक सौरभ मलुष्टे यांचे आभार मानले. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ मलुष्टे मित्र मंडळाचे सभासद चिनार आचरेकर, शिवराज पाटील, अभिषेक सुर्वे, दिनेश जठार, चिनार प्रसादे, योगेश विरकर, तृप्ती विरकर, तेजल पाटील, सुनील बेंडखळे, राजा बामणे, अविनाश भोसले, सुरज सावंत, दीपक मेस्त्री आणि प्रेमराज फोडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच समृद्धी सर्व्हिसेसचे संदीप चव्हाण व स्नेहा चव्हाण यांनी कॅम्पसाठी विशेष तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य केले.

प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजना आणि सार्वजनिक सुविधांचा लाभ त्यांच्या घराजवळ सहज मिळावा, यासाठी मी कटिबद्ध आहे. भविष्यातही नागरिकांच्या सोयीसाठी अशा स्वरूपाचे विविध उपक्रम प्रभागात सातत्याने राबविले जातील.”

— सौरभ मलुष्टे, शिवसेना नगरसेवक, रत्नागिरी पालिका

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...