रत्नागिरी शहरातील राम आळी येथील वहाळ गटार आणि घुडेवठार भागात उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत स्विमिंग पूल च्या कामाची नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
या प्रकल्पाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, हा आमचा मानस आहे. या पाहणी दरम्यान कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि कामही गतीने होईल, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ दिले असल्याचे सौ शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले आहे
रत्नागिरीचा विकास आणि नागरिकांची सोय हीच आमची प्राथमिकता आहे!
यावेळी शहरप्रमुख श्री.बिपिन बंदरकर, स्थानिक नगरसेविका सौ.वर्षा ढेकणे,दादा ढेकणे,नगरपालिका अभियंता,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
रत्नागिरी शहरातील राम आळी येथील वहाळ गटार आणि घुडेवठार भागात उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत स्विमिंग पूल च्या कामाची नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली
