रत्नागिरीरत्नागिरी शहरानजिकच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे)...

रत्नागिरी शहरानजिकच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने शिरगांव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूसमयी धनश्री यांचे वय ४९ वर्षे इतके होते. अल्पशा आजारपणामुळे त्यांच्यावर कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. एक मनमिळावू हसतगुख, सुस्वभावी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. शिरगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंचपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले होते. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील विकासकागे मार्गी लावण्यात त्यांचा मोठा हातभार लाभला. आजही त्यांचा वेळोवेळी सामाजिक, राजकीय उपक्रमात त्या कार्यरत होत्या.

धनश्री यांच्या निधनाने त्यांचा परिवार, नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरगाव तिवंडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे खंदे समर्थक दिपक नारायण सनगरे यांच्या त्या पत्नी होत. धनश्री यांच्या पश्चात पती, दोन गुलगे असा परिवार आहे. मंगळवार ८ जुलै रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शिरगाव येथील स्मशानभूगीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईक गावातील ग्रामस्थ सागाजिक, राजकीय क्षेत्रातील गंडळींनी बहुसंख्येने उपस्थिती होती. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Breaking News