रत्नागिरीरत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांचा जाहीर...

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांचा जाहीर सत्कार.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नव निर्वाचित नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांचा रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौ शिल्पाताई सुर्वे यांना सन्मान पत्र देण्यात आले. सौ.शिल्पाताई यांच्या सोबत सेवार्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक सन्घाच्या सहकार्याने गेली अनेक वर्षे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे रत्नागिरीचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री सौरभ मलुष्टे यान्चाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौ शिल्पाताई सुर्वे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेऊन रत्न नगरीच्या नागरिकानी आपल्यावर टाकलेली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी पार पाडण्याचे काम करण्याचे अभिवचन दिले..
या कार्यक्रमाला शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News