राजापूरराजापुर तालुक्यातील रायपाटण येथे अवैध रित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

राजापुर तालुक्यातील रायपाटण येथे अवैध रित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईमध्ये “गोवंश वाहतूक करणाऱ्या तीन इसमांवर कारवाई”
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी ते पाचल मार्ग अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने हे पथक वाहनांची तपासणी करत असताना ही कारवाई करण्यात आली
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव दरम्यान गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक 28/08/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागामध्ये गस्त करत असताना ओणी ते पाचल मार्ग अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने हे पथक रायपाटण येथे वाहनांची तपासणी करण्याकरिता दि. 29/08/2025 रोजी 03.30 वाजता थांबले व वाहनांची तपासणी करीत असताना 05.55 वाजता एक महींद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 व त्या पाठोपाठ आयशर प्रो-1059 मॉडेलये चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 ही वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता महींद्रा कंपनीची जीनीओ मॉडेल चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 या वाहनाच्या हौद्यामध्ये 8 गोवंश जातीची जनावरे तसेच आयशर प्रो-1059 मॉडेलचे चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 या वाहनाच्या हौद्यामध्ये गोवंश जातीची जनावरे अशी एकूण 19 जनावरे यांना दोरी च्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेले मिळून आले.
या दोन्ही गाडीतील गोवंश जनावरांना गाडीतील हौद्यात पाणी न देता गाडीमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून तसेच त्यांच्या खाद्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्याच्या कत्तलींकरिता वाहतूक करीत असताना मिळून आले. म्हणून या गोवंश जनावरांच्या दोन्ही गाडीच्या चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश जनावरे वाहतुकीचा परवाना अगर पशु-वैद्यकीय अधिकाऱ्याऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्यांनी सांगीतले म्हणून दोन पंचांसमक्ष नाव-गाव विचारले असता चालकांनी आपली नावे 1) विनायक मनोहर भोईटे, वर्ष 38 वर्षे, रा. पांगरी रोड, टेणुकानगर, निपाणी, शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगावी, राज्य कर्नाटक (महींद्रा कंपनीची जीनीओ मॉडेलचे चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 वरील चालक) व 2) समीर बाळासो मुजावर, वय 31 वर्षे, रा. वॉर्ड नं. 24, कारंडेमळा, गल्ली नं. 3, शहापुर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (आयशर प्रो-1059 मॉडेलये चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 वरील चालक) असे सांगितले तसेच या दोन्ही इसमांकडे गोवंश जनावरे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गोवंश जनावरे 3) तरबेज चाँदनीयाँ ठाकुर रा. परटवली, ता. राजापुर, जि. रत्नागिरी यांच्याकडून आणल्याचे सांगीतले.
या दोन्ही वाहनांमध्ये मिळून आलेली एकूण 19 गौवंश गुरे कत्तल करण्यासाठी गैरकायदा बिगर परवाना अवैधरित्या वाहतूक करुन घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून वरील नमूद तीनही इसमांवर राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजिस्टर नंबर 161/2025 प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (घ), (ङ), 11 (3) (क) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (31), 5 (ब) व 9 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, 3/181 प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47,48,49,50,51,54,56 भा. न्या. में 2023 चे कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु असून या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे व दोन वाहने मिळून ₹ 20,66,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच 19 गोवंश गुरांची सुटका करण्यात आलेली आहे.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन डेरे व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

1) श्रेणी पो.उनि. श्री ओगले,

2) स.पो.फो. गोटे,

3) पो.हवा/251 झोटे,

4) पो.हवा/301 पालकर,

5) पो.हवा/288 राजवैद्य,

6) पो.हवा/1067 कदम,

7) पो.हवा/1362 सवाईटाम,

8) पो. हवा/1408 शेट्ये,

9) चा.पो.कॉ/215 कांबळे

Breaking News