चिपळूणराज्यस्तरीय चिपळूण मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डे विद्यालयाची दमदार कामगिरीपाच गटांपैकी चार गटांत धावपटूंचे...

राज्यस्तरीय चिपळूण मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डे विद्यालयाची दमदार कामगिरीपाच गटांपैकी चार गटांत धावपटूंचे वर्चस्व

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्या वतीने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय चिपळूण हाफ मॅरेथॉन 2025 स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या भव्य मॅरेथॉनचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाले. पाच गटांमध्ये विभागलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 5000 पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.

विद्यालयातील 64 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून त्यापैकी पाच धावपटूंनी विजेतेपद मिळवत सावर्डे विद्यालयाचा गौरव वाढवला.

विजेते धावपटू :

14 वर्षे मुली गट (5 किमी) : इच्छा हरिश्चंद्र राजभर – प्रथम

14 वर्षे मुले गट (5 किमी) : अर्णव सुर्वे – प्रथम

16 वर्षे मुली गट : हमेरा हुमायून सय्यद – प्रथम

16 वर्षे मुली गट : वेदिका संतोष बामणे – द्वितीय

17 वर्षे मुले गट : पृथ्वी हरिश्चंद्र राजभर – प्रथम

या विजयी कामगिरीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्धजी निकम, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

धावपटूंना क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे आणि अमृत कडगावे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...