विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला दिलेल्या भरभरून पाठिंब्यामुळे ना. उदय सामंत ह्यांनी आपले ऋण व्यक्त केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखंडपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने समाजातील प्रत्येक घटकासाठी विधायक कामगिरी केली आहे. शिवसैनिक म्हणून ही कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आपले कर्तव्य आहे. तसेच सोलापूरमध्ये शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी सर्वाधिक व्हावी यासाठी ना. उदय सामंत ह्यांनी सर्वांना आवाहन करण्यात आले.
या सभेला मंत्री शंभूराजे देसाई, प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी सोलापूर दौऱ्यात शिवसेना पक्षाच्या जाहीर सभेला उपस्थित राहून सोलापूरकर जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.
