राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मा. श्री नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पण वाढदिवसानिमित्त कणकवली येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या–.
कोकणातील विकासा साठी नारायण राणे साहेबांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ते, पूल, बंदरे, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा तसेच पर्यटनवाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कोकणातील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीसाठी त्यांनी घेतलेले पुढाकार आजही विकासाच्या रूपाने दिसून येतात.
त्यांचे नेतृत्व, विकासदृष्टी आणि कोकणाशी असलेली नाळ ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, मंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री सुनीलजी तटकरे, मंत्री मा. श्री आशिषजी शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार. नीलेश राणे, आमदार मा. श्री प्रवीण दरेकर, आमदार श्री प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
