रत्नागिरीराष्ट्रवादीचे नेते नौशीन काझी यांच्या मध्यस्थी मुळे अनर्थ टळला.सर्वांनीच केले कौतुक

राष्ट्रवादीचे नेते नौशीन काझी यांच्या मध्यस्थी मुळे अनर्थ टळला.सर्वांनीच केले कौतुक

निवडणूकीत पराभव झाला असला तरी खचून न जाता जनते साठी नौशीन काझी सदैव तत्पर असल्याचे दिसून येत आहे.

👉 रत्नागिरी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून कोकण नगर येथे मोठ्या बंदोबसामध्ये सुरू केलेली धडक कारवाई नौसीन काझी यांच्या हस्तक्षेपामुळे थांबवण्यात आली असल्याने तेथील गाळेधारक, व्यावसायिक यांना गाळ्यामधील महत्त्वाचे सामान हलवण्यासाठी वेळ मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.


कोकण नगर ही एक मोठी मार्केट आहे आणि या मार्केटवर अचानकपणे जेसीबी लावून केलेल्या कारवाईमुळे गाळेधारकांची तारांबर उडाली व ते आपलं सामान वाचवण्यासाठी धावपळ करू लागले पण प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होते यावेळी नौसीन काझी यांनी एका देवदूताप्रमाणे इंट्री करून ही सर्व कारवाई थांबवली.
कारवाई थांबवल्यामुळे आता येथील गाळे धारक व त्या गाळ्यामध्ये असणारे सामान हे अति महत्त्वाचे व खूप महागातल तसेच गरजेचे असल्यामुळे हे स्थलांतरित करण्यासाठी वेळ मिळाला आणि यामुळे गाळेधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
नौसीन काझी यांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टाळण्यात आला सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Breaking News