रत्नागिरीराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.—

चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण, ,
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. ज्ञानोबा बोकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडांचे महत्त्व, नियमित व्यायामामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे आणि व्यक्तिमत्त्व विकासात खेळांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन निरोगी व शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
त्यानंतर जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धांचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळ, बॅडमिंटन यांसह विविध मैदानी व बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम अत्यंत उत्साही व क्रीडामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...