चिपळूणरेल्वे फाटक न पडता रेल्वे निघून गेल्याने अनर्थ टळला,आता नागरिकांच्या जिवाशी किती...

रेल्वे फाटक न पडता रेल्वे निघून गेल्याने अनर्थ टळला,आता नागरिकांच्या जिवाशी किती खेळणार- शौकत मुकादम

चिपळूण: शनिवार दि.22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 ते 7.45 दरम्यान चिपळूण वरुन रत्नागिरीकडे पुढे धावणारी प्रयागराज एक्सप्रेस तात्पुरती सुरु असलेली गाडी ही जाते वेळी कळंबस्ते फाटक न पडताच निघून गेली त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने कोणतिही जिवीत हानी झाली नाही.भविष्यात या ठिकाणी नागरिकांचे बळी घेणार का?असा प्रश्न कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी उपस्थित केला आहे.गेली अनेक वर्ष या कळंबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाण पुल व्हावा अशी मागणी नागरिकां मार्फत होत आहे. दिवसातुन किमान पन्नास वेळी हे फाटक पाडले जाते.यामुळे चिपळूण व खेड येथील सुमारे पंचवीस ते त्याहुन अधिक गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या पुलासाठी निधी पन्नास टक्के महाराष्ट्र शासन व पन्नास टक्के रेल्वे प्रशासन असे ठरवण्यात आले आहे.रेल्वे प्रशासनाने पन्नास टक्के निधीची तरतुद केल्याचे समजते मात्र महाराष्ट्र शासनाकडून निधीची तरतुद झालेली नाही. या करीता कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम ,आमदार भास्कर जाधव,आमदार शेखर निकम तसेच लोकप्रतिनीधी पाठपुरावा करीत आहेत.परंतु आज तागायत महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने पुलाचे काम प्रलंबित आहे.तरी महाराष्ट्र शासनाने येणा-या काळात पुलासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी होत आहे. वरील निधीसाठी आमदार शेखर निकम,शौकत मुकादम हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्षात भेट घेवुन रेल्वे पुल किती महत्वाचा आहे हे निदर्शनास आणुन देणार आहेत.या संदर्भात रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांना ही सदरचा पुल नसल्याने डोकेदुखी झालेली आहे.व नागरिकांमधुनही गेले अनेक वर्ष पुल होत नसल्याने संताप होत आहे.येणा-या काळात सदरचा पुल न झाल्यास अंदोलन होवु शकते अशी चर्चा आजुबाजुच्या गावात होत आहे.आदोंलन झाल्यास त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन व रेल्वे प्रशासन यांची राहील असे शौकत मुकादम यांनी सांगितले आहे.

Breaking News