लांजालांजा येथील काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते नुरूद्दीन सय्यद बनले रत्नागिरी जिल्हा काँग्रेस...

लांजा येथील काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते नुरूद्दीन सय्यद बनले रत्नागिरी जिल्हा काँग्रेस दक्षिण चे नवे जिल्हाध्यक्ष तर रमेश कीर, हुस्नबानू खलीफे यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. या कार्यकारिणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर आणि माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस ने रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात केले आहेत.

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष पदांवर झालेल्या नियुक्त्यांमध्ये यंदा एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. नुरुद्दीन सय्यद यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, तर सोनललक्ष्मी घाग उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे अनुभवी नेते रमेश कीर यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांची देखील प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीकडून झालेल्या या नियुक्त्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निवडीमुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात पक्षाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान रत्नागिरी शहर काँग्रेस चे अध्यक्ष अश्फाक काद्री यांनी नुरूद्दीन सय्यद.रमेश कीर.हुस्नबानु खलिफे व सोनल लक्ष्मी घाघ यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...