रत्नागिरीलांजा शहरातील युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश  - युवा नेतृत्व अरबाज नेवरेकर यांच्या...

लांजा शहरातील युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश  – युवा नेतृत्व अरबाज नेवरेकर यांच्या सह कनगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

💥आमदार किरण सामंत यांच्या निपक्षपाती, विकासाभिमुख आणि सर्वधर्म संभावाच्या नेतृत्वाला स्वीकारत अनेक युवकांनी शिवसेनेचा भगवा घेतला हाती

लांजा : लांजा शहरातील युवकांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला. आमदार सामंत यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीने आणि सर्व समाज बांधवांना समान न्याय देणाऱ्या भूमिकेने प्रेरित होऊन या युवकांनी पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी नव्याने प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करत सांगितले की, “शिवसेना ही सर्वसामान्य जनतेची आणि प्रत्येक धर्माच्या, समाजाच्या बांधवांची सेना आहे. लांजा शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करणे हेच आमचे ध्येय आहे.”

👉कनगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर व अरबाज नेवरेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

लांजा : कनगवली ग्रामपंचायतचे सदस्य शकील वाडेकर तसेच अरबाज नेवरेकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार सामंत यांच्या विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीने प्रेरित होऊन या दोघांनी भगवा हाती घेतला.

या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत सांगितले की, “शिवसेना ही फक्त राजकीय पक्ष नसून जनतेच्या सेवेसाठी झटणारे एक कुटुंब आहे. ग्रामपातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकासाची गती वाढवण्यासाठी अशा तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.”

👉आमदार किरण सामंत यांच्या निपक्षपाती, विकासाभिमुख आणि सर्वधर्म संभावाच्या नेतृत्वाला स्वीकारत युवकांनी शिवसेनेचा भगवा घेतला हाती

लांजा शहरासह परिसरातील युवकांचा शिवसेना पक्षाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आमदार किरण सामंत यांच्या निपक्षपाती, विकासाभिमुख आणि सर्वधर्म संभावाच्या नेतृत्वाला स्वीकारत अनेक युवकांनी अलीकडेच शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

आमदार किरण सामंत यांच्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना समान न्याय मिळावा, विकास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या योजनांमुळे मुस्लिम समाजातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक तरुणांच्या म्हणण्यानुसार, “आमदार सामंत हे सर्व धर्मांतील नागरिकांना एकसमान न्याय देतात आणि नेहमी सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर विश्वास ठेवला,” असे त्यांनी सांगितले.
या माध्यमातून लांजा शहरात शिवसेनेचा जनाधार आणखी मजबूत होत आहे.
यावेळी शकील वाडेकर अक्षय सागवेकर रिजवान मापारी , नइम मापारी, आरिफ चिखली, कैफ मनियार ,राजू तूळसनकर ,संतोष कुंभार साहिल वनू, तबरेज दसुरकर, तौसीम मापारी मोहम्मद याहू ,मंगेश कुंभार, आलिम मापारी, शफी मापारी, यांचे सह अनेक युवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप,शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई,शहर प्रमुख सचिन डोंगरकर ,संदीप दळवी, मुन्ना खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा– पालकमंत्री डॉ. उदय...