रत्नागिरीवडेरू येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातर्फे 'माती परीक्षण' प्रात्यक्षिक संपन्न

वडेरू येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातर्फे ‘माती परीक्षण’ प्रात्यक्षिक संपन्न

वडेरू येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातर्फे ‘माती परीक्षण’ प्रात्यक्षिक संपन्न!

चिपळूण ,वडेरू,२३ मे २०२६,
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांतर्फे वडेरू(ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘माती परीक्षण प्रात्यक्षिका’चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमादरम्यान कृषी दूतांनी शेतकऱ्यांना मातीचा नमुना कधी व कसा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी अथवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी जमिनीतील मातीचा नमुना घ्यावा. त्यानुसारच योग्य खत व्यवस्थापन करावे,” असा महत्त्वपूर्ण सल्ला यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आला. कार्यक्रमात प्रत्यक्ष शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा सामू (pH) आणि मातीचा प्रकार ओळखणे. मातीमध्ये असणारे विविध घटक आणि त्यांचे प्रमाण. माती परीक्षणाचे प्रत्यक्ष फायदे. जमिनीतील पोषक घटक दिवसेंदिवस कसे अबाधित राखता येतील याच्या आधुनिक पद्धती.
हा संपूर्ण उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, मृदाशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री. महेंद्र गावणंग आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदूत कु.अजिंक्य आरे , कु.ओंकार पाटील,कु.शुभम सावंत,कु.आदित्य जाधव,कु.सिध्देश्वर गळवे,कु.अर्थव कोळेकर,कु.रेहान मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...