रत्नागिरीवहाळ येथे मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक

वहाळ येथे मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक

वहाळ येथे मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक

वहाळ, ता. चिपळूण (प्रतिनिधी): गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील विद्यार्थ्यांच्या वतीने वहाळ गावात AHDS अंतर्गत मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ (पनीर व व्हे सूप) तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

या प्रात्यक्षिकामध्ये दूधापासून पनीर तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच पनीर तयार करताना उरलेल्या व्हे (Whey) पासून पौष्टिक व्हे सूप कसे तयार करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन करून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येते, तसेच व्हेचा योग्य उपयोग करून अन्नाची नासाडी कशी टाळता येते याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

या कार्यक्रमास गावातील महिला, शेतकरी व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील विद्यार्थ्यांनी केले. या प्रात्यक्षिकासाठी प्रा. शमिका चोरगे व प्रा. दिव्या कोकणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पनीर व व्हे सूपची चव चाखून त्याबाबत समाधान व्यक्त केले तसेच अशा उपयुक्त प्रात्यक्षिकांचे आयोजन भविष्यातही करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...